गोविंदांचा जल्लोष...
By Admin | Updated: September 7, 2015 04:10 IST2015-09-07T04:10:37+5:302015-09-07T04:10:37+5:30
रस्त्यांवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केल्यामुळे यावर्षी मैदानांमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. मैदानात जागा मिळाल्यामुळे

गोविंदांचा जल्लोष...
नवी मुंबई : रस्त्यांवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केल्यामुळे यावर्षी मैदानांमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. मैदानात जागा मिळाल्यामुळे आयोजकांसह गोंविदा पथकांमध्ये उत्साह दिसून येत होता. रस्त्यावर उत्सव नसल्यामुळे शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. परंतु मैदाने उपलब्ध न झाल्यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरात जवळपास १०० दहीहंड्या रद्द करण्यात आल्या.
नवी मुंबईमध्ये सकाळपासून मुंबई व इतर ठिकाणच्या गोविंदा पथकांनी दहीहंड्यांना सलामी देण्यास सुरवात केली होती. गतवर्षी तब्बल २६७ मोठ्या सार्वजनिक दहीहंड्या होत्या. यावर्षी हा आकडा १६७ वर आला आहे. मैदाने उपलब्ध न झाल्यामुळे जवळपास १०० मंडळांना उत्सव रद्द करावा लागला. अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत केली. नवी मुंबईमधील मूळ गावांमध्ये दहीहंडी पथकांनी एक महिन्यापासून जय्यत तयारी सुरू केली होती. मुंबईमधील पथकांच्या तोडीस तोड थर मंडळांनी लावले.