कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ !

By Admin | Updated: February 17, 2016 02:25 IST2016-02-17T02:25:52+5:302016-02-17T02:25:52+5:30

कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ अशी अवस्था वाशी पोलिसांनी अटक केलेल्या कपिल राजपूत याची झाली आहे.

Gopal beats even after killing millions! | कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ !

कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ !

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
कोट्यवधींचा अपहार करूनही ठणठण गोपाळ अशी अवस्था वाशी पोलिसांनी अटक केलेल्या कपिल राजपूत याची झाली आहे. राजपूतने देशभरात अनेकांना फसवलेले असल्याने पोलिसांकडून त्याच्या अटकेचा आॅल इंडिया वायरलेस मेसेज करण्यात आला आहे.
द्वारका मिल्क कंपनीत गुंतवणूक व कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कपिल राजपूत याच्यासह पाच जणांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांसह विविध बँकांची त्यांनी ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी राज्यात मुंबई, नवी मुंबई, नगर, फलटण या ठिकाणांसह राज्याबाहेर देखील अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. द्वारका मिल्क, द्वारका अ‍ॅग्रो, समर्पण फार्म, द्वारका फूड, द्वारका रिटेल बझार व इतर २४ हून अधिक कंपन्यांचा तो संचालक होता. या कंपन्यांमध्ये मुख्य पदावर मर्जीतल्या व्यक्तींना घेऊन कंपन्यांची कागदोपत्री कोट्यवधींची उलाढाल दाखवली जायची. त्याद्वारे नफ्याचे आमिष दाखवून अनेकांकडून आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. त्यापैकी काही कंपन्या बँकेच्या कर्जावरदेखील उभ्या केल्या होत्या. याचदरम्यान सन २०११ साली वाशी येथे द्वारका मिल्कचे उद्घाटन तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करून त्याने स्वत:ची राजकीय कुवत मोठी असल्याचे भासवले. तसेच काही बँकांमध्येही स्वत:ची ओळख निर्माण करून कंपन्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्जही घेतले. तर ओळखीतून कर्ज मिळवून देण्याचे अनेकांना आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम तो स्वत: हडप करायचा. अशाच प्रकारे मालाडचे सुभ्रतो दत्ता यांना वाशीच्या पंजाब अँड नॅशनल बँकेतून मंजूर झालेले साडेसहा कोटी रुपये कपिल राजपूत याने सहकाऱ्यांच्या मदतीने स्वत:च्या बँक खात्यात वळवले होते. यामध्ये सदर बँकेचा तत्कालीन डेप्युटी जनरल मॅनेजर राजेश्वर गोयल याचाही सहभाग आढळल्याने वाशी पोलिसांनी त्यालाही दिल्लीतून अटक केली आहे. या प्रकरणातीत बँकेचा पिच्छा सोडवण्यासाठी सुभ्रतो यांना मुंबईचे घरही विकावे लागले आहे.

Web Title: Gopal beats even after killing millions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.