सोन्याची बिस्किटे पडली महागात

By Admin | Updated: October 14, 2016 06:53 IST2016-10-14T06:53:25+5:302016-10-14T06:53:25+5:30

घरकाम करणाऱ्या महिलेला सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून ४३ हजारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. खरे दागिने घेवून मोबदल्यात सोन्याचा

The gold biscuits fell in the sky | सोन्याची बिस्किटे पडली महागात

सोन्याची बिस्किटे पडली महागात

नवी मुंबई : घरकाम करणाऱ्या महिलेला सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून ४३ हजारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. खरे दागिने घेवून मोबदल्यात सोन्याचा मुलामा दिलेली बिस्किटे देवून दोघांनी पलायन केले आहे.
सानपाडा परिसरात राहणाऱ्या एक महिलेला दोन व्यक्तींनी आमच्याकडे सोन्याची बिस्किटे असल्याचे सांगितले होते. तुमच्याकडील दागिने दिल्यास त्यापेक्षा जास्त वजनाची बिस्किटे देण्याचे आमिष त्यांनी महिलेस दाखविले. त्या दोघांवर विश्वास ठेवून महिलेने ४३ हजारांचे दागिने त्या दोघांना दिले. मोबदल्यात सोन्याची बिस्किटे घेतली. महिलेने नंतर बिस्किटे सोन्याचीच आहेत का याची खात्री केली असताना त्यावर केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे निदर्शनास आले. वस्तुस्थिती कळताच दोघांविरोधात सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The gold biscuits fell in the sky