तणावामुळे तरुणीची आत्महत्या
By Admin | Updated: August 15, 2015 22:58 IST2015-08-15T22:58:54+5:302015-08-15T22:58:54+5:30
शुक्रवारी दुपारी दिवाळे खाडीमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मोसीना साखरकर (२८) असे तिचे नाव असून, आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तणावामुळे तरुणीची आत्महत्या
नवी मुंबई : शुक्रवारी दुपारी दिवाळे खाडीमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मोसीना साखरकर (२८) असे तिचे नाव असून, आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मोसीना नेरूळची असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. यानुसार तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला असता ती सकाळी घरातून बाहेर निघाल्याचे समजले. म्हणजे घरातून निघाल्यावर काही वेळातच तिने नेरूळ खाडीत आत्महत्या केली आणि त्यानंतर खाडीच्या पाण्यासोबत वाहत तिचा मृतदेह दिवाळेच्या जेट्टीपर्यंत पोचला असावा, असे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.
मृतदेहावर कोणत्याही प्रकारची जखम नसल्याने तिने आत्महत्याच केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बीएस्सीपर्यंत शिक्षण झालेली मोसीना काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. या तणावातच तिने आत्महत्या केली असावी, असेही
बागडे यांनी सांगितले.
परंतु तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पोलिसांना कळलेले नाही. (प्रतिनिधी)