रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी
By Admin | Updated: May 31, 2017 06:18 IST2017-05-31T06:18:33+5:302017-05-31T06:18:33+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (३०) दुपारी आॅनलाइन

रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (३०) दुपारी आॅनलाइन जाहीर झाला. जिल्ह्यातील ८९.३० टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले. या वर्षीही मुलांना मागे टाकत ९३.३५ टक्के मुलींनी बाजी मारली, तर ८५.५३ टक्के मुले पास झाली. दुपारी एक वाजता आॅनलाइन निकाल जाहीर होणार असल्याने विविध सायबर कॅफेमध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. काहींनी थेट आपापल्या मोबाइलवरच निकाल जाणून घेतला. रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५६ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.
१२ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३२ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातून ३२ हजार ७१९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १४ हजार ४९७ मुले तर १४ हजार ७२२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या २९ हजार २१९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. ८ हजार ३४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ हजार ८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, २ हजार ३७७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
माणगाव : बारावी परीक्षेत माणगाव एज्युकेशन ट्रस्ट माणगाव संचालित एस.एस.निकम इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजने शंभर टक्के सलग निकालाची परंपरा कायम ठेवल्याने संस्थेचे कौतुक होत आहे.या कॉलेजमधून फेब्रुवारी २०१७ मध्ये एकूण ५१ विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.अकीब खलीद हसवारे याने ८६ टक्के गुण संपादन के ले.
अकीबने प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. अपूर्वा अग्रवाल८५.३८ टक्के गुण व्दितीय तर मेहवीश म. जाहीद हर्णेकर ७६.६२ टक्केतृतीय क्र मांक पटकाविला. महाविद्यालयातील १० विद्यार्थी विशेष श्रेणीत, १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २२ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, चेअरमन दत्ता कुलकर्णी, शिक्षकांंनी अभिनंदन के ले.