शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:35 IST

नवी मुंबईमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नवी मुंबईमधूनअपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईच्या न्यू पनवेल परिसरात एका १९ वर्षीय मुलीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री ८.४५ वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे. या मुलीचे नाव तिथी सिंग (वय १९) असे असून ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे.

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये रेखा यादव (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. चे पती गोपाल यादव (वय 54) हे अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोपाल आणि रेखा यादव हे पनवेलमधील देवद भागात वास्तव्याला आहेत. रेखा यादव या घाटकोपरच्या पंतनगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. बुधवारी रात्री रेखा यादव आणि त्यांचे पती गोपाल यादव स्कुटरवरुन घरी परत येत होते. त्यावेळी शीव-पनवेल महामार्गावरील खारघर परिसरात असणाऱ्या हिरानंदनी पुलावरून त्यांची स्कूटर खाली उतरत होती. त्यावेळी तिथी सिंग ही तिच्या मर्सिडीज कारने भरधाव वेगात येत होती. तिच्या मर्सिडीज बेंझ कारने पाठीमागून यादव दाम्पत्याच्या स्कूटरला धडक दिली.

मर्सिडीज कार वेगात असल्याने रेखा यादव आणि गोपाल यादव दोघेही हवेत फेकले गेले आणि जोरात खाली आपटले. यामध्ये रेखा यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोपाल यादव यांच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतर वाहन चालकांनी जखमी गोपाल व त्यांची पत्नी रेखा या दोघांना बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले.   

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबई