मुलीने स्वत:ला महाविद्यालयात डांबून ठेवले

By Admin | Updated: April 14, 2017 03:38 IST2017-04-14T03:38:48+5:302017-04-14T03:38:48+5:30

खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात शिकत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने हल्ला झाल्याचा बनाव करीत महाविद्यालयातीलच

The girl kept herself in college | मुलीने स्वत:ला महाविद्यालयात डांबून ठेवले

मुलीने स्वत:ला महाविद्यालयात डांबून ठेवले

पनवेल : खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कॉमर्स शाखेत पहिल्या वर्षात शिकत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने हल्ला झाल्याचा बनाव करीत महाविद्यालयातीलच स्वच्छतागृहात स्वत:ला रात्रभर डांबून ठेवले. विशेष म्हणजे बुधवारी १२ रोजी पेपर संपल्यानांतर रात्रभर मुलगी घरी आलीच नसल्याने पालकांनी यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
महाविद्यालय उघडताच चौथ्या माळ्यावरील शौचालयात ही सतरा वर्षीय विद्यार्थिनी एकटीच असल्याचे तेथील कामगाराच्या लक्षात आले. दरम्यान, या मुलीच्या पालकांनी महाविद्यालयात धाव घेऊन आकांडतांडव करण्यास सुरुवात केली. मुलीला तिच्या वर्गातील मैत्रिणीने मारून डांबून ठेवण्याचा आरोप करीत, जोपर्यंत त्या मुलींना याठिकाणी आणले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. खारघर पोलिसांनी त्या विद्यार्थिनीची चौकशी करण्यास सुरुवात केली. तसेच रात्र काढलेल्या त्या स्वच्छतागृहांची देखील पाहणी पोलिसांनी केली. या विद्यार्थिनीने स्वत:च स्वत:ला डांबून ठेवल्याची कबुली दिली. या मुलीने वर्गातील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्या अकाऊंटमधून अनेकांशी चॅटिंग करीत असल्याचे उघडकीस आल्यानंतर हा बनाव समोर आला. पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी या प्रकरणी माहिती दिली. प्राचार्या तपासे यांना देखील हा प्रकार सकाळीच समजल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The girl kept herself in college