घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन अखेर मागे

By Admin | Updated: December 12, 2014 02:11 IST2014-12-12T02:11:03+5:302014-12-12T02:11:03+5:30

महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा वेळेत देत नसल्याचा आरोप करून बुधवारपासून घंटागाडी कर्मचा:यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले.

Ghantagadi Employee: The movement is finally behind | घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन अखेर मागे

घंटागाडी कर्मचा:यांचे आंदोलन अखेर मागे

ठाणो : महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा वेळेत देत नसल्याचा आरोप करून बुधवारपासून घंटागाडी कर्मचा:यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आणि ठेकेदारानेही वेतन देण्यास सुरुवात केल्यानंतर आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 
गुरुवारी त्यांनी पालिकेतच ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या संपात आणखी 55 घंटागाडी कर्मचा:यांनी भाग घेतला होता.  शहरात आता ठिकठिकाणी कच:याचे ढीग साचण्याची भीती होती. वेळेत वेतन न देण्याच्या मुद्यावरून ठेकेदार आणि घंटागाडी कर्मचा:यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. शहरातील विविध भागांत कचरा उचलण्याचे काम करणा:या 3क् मोठय़ा आणि 34 छोटय़ा अशा एकूण 64 घंटागाडय़ांच्या कामगारांनी कामबंदचे हत्यार उपसले होते. त्यांना गुरुवारी आणखी 3क् मोठय़ा आणि 25 छोटय़ा घंटागाडय़ांच्या कर्मचा:यांनीसाथ दिली. हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची चिन्हे असतानाच आंदोलन मागे घेण्यात आले.

 

Web Title: Ghantagadi Employee: The movement is finally behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.