गेना प्रसादचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू, नवी मुंबईतील बडोदा बँक दरोडा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:42 AM2017-12-02T05:42:16+5:302017-12-02T05:42:30+5:30

बडोदा बँक दरोड्यातील गेना प्रसाद उर्फ भवरसिंग राठोड याचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याने बँकेलगतचा गाळा भाड्याने घेऊन साथीदारांच्या ताब्यात देऊन पळ काढला होता.

 Gena Prasad was killed two months ago, Baroda Bank Draft Case in Navi Mumbai | गेना प्रसादचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू, नवी मुंबईतील बडोदा बँक दरोडा प्रकरण

गेना प्रसादचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू, नवी मुंबईतील बडोदा बँक दरोडा प्रकरण

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : बडोदा बँक दरोड्यातील गेना प्रसाद उर्फ भवरसिंग राठोड याचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याने बँकेलगतचा गाळा भाड्याने घेऊन साथीदारांच्या ताब्यात देऊन पळ काढला होता. मात्र, दरोडा पडण्यापूर्वीच मेंदूच्या आजाराने राजस्थान येथे त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
सुमारे ४० फूट लांब भुयार खोदून जुईनगर येथील बडोदा बँकेचे लॉकर लुटल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. यामध्ये ज्या गाळ्यातून भुयार खोदण्यात आले होते, तो गाळा
गेना प्रसाद नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतला होता. मात्र, गाळा भाड्याने घेतल्यानंतर त्याचा ताबा सहकाºयांकडे देऊन तो काही दिवसांतच त्या ठिकाणावरून पळून गेला होता.
पळ काढण्यापूर्वी या गाळ्याचा भाडेकरार लगतच्याच एका व्यावसायिकासोबत झाला होता. मात्र, त्यांचा व्यवहार फिसकटल्याने दलालामार्फत गेनाने महिना ३० हजार रुपये भाड्याने हा गाळा मिळवला होता. यामुळे गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी भाडेकरारावर उल्लेख असलेल्या गेना प्रसाद याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
सखोल तापासात गेना प्रसाद याचे खरे नाव भवरसिंग राठोड असून, तो मूळचा राजस्थानचा राहणारा असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलीस त्याच्या शोधात असताना दोन महिन्यांपूर्वीच मेंदूच्या आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे तीन
किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारांमध्ये राठोडचा महत्त्वाचा सहभाग होता. मात्र, कटाप्रमाणे बँक लुटण्यापूर्वीच त्याचा राजस्थान येथे मृत्यू झाला.

Web Title:  Gena Prasad was killed two months ago, Baroda Bank Draft Case in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.