गॅसवाहिनी जुन्या मार्गानेच टाकावी
By Admin | Updated: November 29, 2014 22:26 IST2014-11-29T22:26:43+5:302014-11-29T22:26:43+5:30
शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे.

गॅसवाहिनी जुन्या मार्गानेच टाकावी
कर्जत : कर्जत तालुक्यातील अनेक गावांतून शेतजमिनीतून जाणारी गॅस पाइपलाइन तालुक्यातील शेतकरी जनतेवर अन्यायकारक असल्याने शासनाने तो प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणो यांनी शासनाकडे केली आहे.
रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइनसाठी यापूर्वी कर्जत तालुक्यातील पन्नास गावांतील शेतजमीन अधिग्रहित केली आहे. त्याच मार्गातून नव्याने टाकली जाणारी पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी केली आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून आलेल्या कच्च्या गॅसवर प्रक्रिया करण्यासाठी कच्चे ऑइल उरण येथून चाकणमार्गे शिक्र ापूर येथे नेण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतक:यांचे नुकसान होणार आहे. कारण कर्जत, खालापूर आणि पनवेल तालुक्यातून उरण अशी जात आहे. कर्जत तालुक्यातून बोर घाटातून ही पाइपलाइन पुढे पुणो जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तेथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्नणा एलपीजी कंपनीने उभी केली आहे. त्यासाठी उरण बंदरातून कच्चे तेल नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशाने जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम रायगड उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्जत तालुक्यात भिवपुरी कॅम्प, येथून कडावमार्गे राजनाला भागातून पुढे रेल्वे पट्टा अशी पुढे खालापूर आणि पनवेल तालुक्यात जाणार आहे.(वार्ताहर)
च्पाइपलाइनसाठी दोनशे शेतक:यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे काम सुरू असून त्यासाठी शेतक:यांना अत्यल्प मोबदला दिला जात आहे.
च्कर्जत तालुक्यातील शेतक:यांचे नुकसान करणा:या या पाइपलाइनसाठी आमची जमीन मिळणार नाही, अशी भूमिका कर्जत तालुक्यातील शेतक:यांनी घेतली आहे.