गॅस टँकर अपघातात चालक ठार
By Admin | Updated: September 7, 2015 04:06 IST2015-09-07T04:06:15+5:302015-09-07T04:06:15+5:30
चिंचपाडा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग चारवर उरण डीपीएस कंपनीमधून नागपूरला जाण्यासाठी निघालेल्या एचपी गॅसने भरलेल्या टँकरला

गॅस टँकर अपघातात चालक ठार
पनवेल : चिंचपाडा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग चारवर उरण डीपीएस कंपनीमधून नागपूरला जाण्यासाठी निघालेल्या एचपी गॅसने भरलेल्या टँकरला (जीजे १२, ०२-६५६२) झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
चिंचपाडा गावाजवळील डी पॉइंटवर हा अपघात झाला. नागपूरकडे जाण्यासाठी निघालेला एच. पी. कंपनीच्या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटला.
या अपघातात टँकरचालक शांताराम पाटील याचा जागीच मृत्यू झाला. टँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. सुदैवाने अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतल्याने दुर्घटना टळली. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. (प्रतिनिधी)