शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गॅसगळती; अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:00 IST

अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला; प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्ती झाल्याने अनर्थ टळला

कळंबोली : नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील गॅस गळतीची घटना ताजी असतानाच पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकच्या व्हॉल्व्हमधून प्राणवायू गळतीची घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली. वेळीच दक्षता घेत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दुरुस्ती काळात रुग्णांना ड्युरावरून ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला होता. त्यामुळे उपचार करण्यासाठी कोणतीही बाधा आली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय पदाधिकारी दाखल झाले होते. पण तोपर्यंत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

पनवेल शहर तसेच ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी चारच्या सुमारास ऑक्सिजन टॅंकला जोडलेला व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने ऑक्सिजन गळती झाली. वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन पुरवठा पुरेसा राहावा याकरिता उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या सुरक्षेसाठी तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

त्रिस्तरीय सुरक्षा असल्याने वेळीच वायू गळती होत असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी ड्युरावरून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.  उपजिल्हा रुग्णालयात  १५० रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्याचबरोबर पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनNavi Mumbaiनवी मुंबई