शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुंड जगदीश गायकवाडने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:19 IST

‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांना केली होती शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी पनवेलमधील गुंड आणि माजी उपमहापौर जगदीश गायकवाड याला अटक केली. बुधवारी अटक करून पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचवेळी दुसऱ्या गुन्ह्यात कर्जत पोलिस त्यास अटक करण्यासाठी  आले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यामुळे तिथे घबरटा पसरली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

शिविगाळ केल्याचा ऑडिओ झाला व्हायरलn दलित नेत्यांच्या विरोधात अतिशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचा गायकवाड याचा ऑडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत असल्याने त्याच्याविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. n आंबेडकरांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही त्याने अश्लाघ्य भाषेत शिविगाळ केली होती. यानंतर त्याची  रिपाइंच्या रायगड जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. n बुधवारी त्याच्याविरोधात  वंचित बहुजन आघाडीने मोर्चाही काढला होता. मंगळवारी त्याच्या घरावरही जमावाने दगडफेक केली होती. 

तडिपारीचीही केली होती कारवाईनवी मुंबई विमानतळाच्या आंदोलनप्रसंगी त्याने तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घाणेरड्या भाषेत टीका केली होती. यानंतर त्यास तडिपार करण्यात आले हाेते. मात्र, केंद्रीय मंत्री आठवले यांच्या  मध्यस्थीनंतर त्याची तडिपारी मागे घेण्यात आली होती. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliceपोलिस