शहरात महिला टोळीचा धुमाकूळ
By Admin | Updated: May 22, 2016 02:04 IST2016-05-22T02:04:54+5:302016-05-22T02:04:54+5:30
विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार महिलांना सानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींना लुटण्यासह दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे काम या महिला करायच्या.

शहरात महिला टोळीचा धुमाकूळ
नवी मुंबई : विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार महिलांना सानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींना लुटण्यासह दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे काम या महिला करायच्या. त्यापैकी काहींवर यापुर्वी देखिल गुन्हे दाखल आहेत.
रात्रीच्या वेळी मद्यपान करुन घरी चाललेल्या आरटीओ दलालाला लुटल्याची घटना सानपाडा पुलालगत घडली होती. घटनेनंतर सदर दलालाने वेळीच संपुर्ण प्रकाराची माहिती सानपाडा पोलीसांना दिलेली. त्यानुसार लुटारुंच्या शोधात पोलीस असताना दोन महिलांची टोळी त्यांच्या हाती लागली. बबीता हंगीरगे व मुक्ता घनराज असे दोघींचे नाव आहे. त्या कळंबोली परिसरातील झोपडपट्टीत राहनारया आहेत. त्यांच्यावर यापुर्वी देखिल खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोघी रात्रीच्या वेळी रस्त्याने चालेल्या मद्यपींचा शोध घ्यायच्या. त्यानंतर डुलत चालेल्या मद्यपीला एकांतात गाठून त्याच्याकडील रक्कम व ऐवज लुटायच्या असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा होडगे यांनी सांगितले. अशाच प्रकारे त्यांनी कलीम खान यांना लुटले होते. या प्रकारात त्यांच्याकडील ९ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती.
याचदरम्यान सानपाडा रेल्वेस्थानक परिसरातील दुकानात भरदिवसा चोरीची घटना घडली होती. ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने गल्यातील रक्कम पळवली होती. सदर गुन्ह्याची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात झाली असता पोलीसांनी दुकानातील सिसिटीव्ही तपासले. यावेळी दोन महिलांनी त्यांच्यासोबतच्या लहाण मुलींमार्फत त्याठिकाणी चोरी केल्याचे आढळून आले. सदर महिला भिक मागण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. यामुळे त्यांना शोधायचे कुठे असा प्रश्न सानपाडा पोलीसांपुढे उपस्थित झाला होता. अखेर त्यांची छायचित्रे सर्व पोलीसठाण्यांमध्ये माहितीकरिता पाठवण्यात आली होती. दरम्यान तशाच वर्णनाच्या महिला कोपर खैरणे तिन टाकी परिसरात वावरत असल्याची माहिती सानपाडा पोलीसांना मिळाली. यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जावुन त्यांची ओळख पटवुन ताब्यात घेतले. यावेळी त्या महिलांनी पोलीसांच्या तावडीतुन सुटका करुन घेण्यासाठी किळसवाने व घाणेरडे प्रकार देखिल केले. कविता राठोड व मिनाक्षी पवार अशी त्यांची नावे असुन दोघीही शिवडी रेल्वेस्थानक लगतच्या झोपडपट्टीतील राहणारया आहेत. भिक मागण्याच्या बहाण्याने दुकानात गेल्यानंतर गर्दीची संधी साधुन राठोड व पवार दुकानमालकाचे स्वतकडे लक्ष आकर्षित करायच्या. याचवेळी तिच्या दोनपैकी एक मुलगी गल्यातील रक्कम चोरुन निघुन जायची. त्यानुसार या चौघींनाही अटक केल्याचे होडगे यांनी सांगितले.