सामूहिक बलात्कारातील आरोपीला अटक; दुसरा अद्याप फरार

By Admin | Updated: June 2, 2014 23:10 IST2014-06-02T22:03:33+5:302014-06-02T23:10:54+5:30

बलात्कार करणार्‍या दोन आरोपींपैकी पंकज बोत्रा (४२) रा. डिव्हाइन प्लाझा, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व) याला रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली.

Gang rape accused arrested; The second is still absconding | सामूहिक बलात्कारातील आरोपीला अटक; दुसरा अद्याप फरार

सामूहिक बलात्कारातील आरोपीला अटक; दुसरा अद्याप फरार

भाईंदर : अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात राहणार्‍या २९ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणार्‍या दोन आरोपींपैकी पंकज बोत्रा (४२) रा. डिव्हाइन प्लाझा, जेसल पार्क, भाईंदर (पूर्व) याला रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. यातील दुसरा आरोपी दीपक अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पंकजला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना लोकल रेल्वे स्थानकात घडली नसून जेसल पार्क चौपाटी परिसरात घडली आहे़ डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २९ वर्षीय महिला (घटस्फोटीत) इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. तिला काम देण्याच्या उद्देशाने दीपक व एका अज्ञात व्यक्तीने ३० मे रोजी फोन करून भाईंदर येथे बोलावले. त्यानुसार भाईंदर पूर्वेस सकाळी ११ च्या सुमारास दीपक व त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या दोघांनी तिला एका कारमधून जेसल पार्क चौपाटी परिसरात नेले. तिला दीपकने बंदुकीचा धाक दाखवून त्याच्यासह दुसर्‍याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर घाबरलेल्या त्या महिलेने थेट डी. एन. नगर पोलीस ठाणे गाठून बलात्काराची तक्रार नोंद केली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासह प्रकरणाचा तपास ३१ मे रोजी नवघर पोलिसांकडे वर्ग केला होता़ 

Web Title: Gang rape accused arrested; The second is still absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.