पनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:10 IST2018-04-19T01:10:51+5:302018-04-19T01:10:51+5:30

गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले ‘अ’ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत.

Ganesh Deshmukh as the commissioner of Panvel | पनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख

पनवेलच्या आयुक्तपदी गणेश देशमुख

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. उपायुक्त जमीर लेंगरेकर व संध्या बावनकुळे यांनी त्यांचे पालिका मुख्यालयात स्वागत केले. मात्र, मावळते आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे या वेळी अनुपस्थित होते. गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले ‘अ’ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून बदली होऊन त्यांना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, मिरा-भाइंदर उपायुक्तपदी काम केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

Web Title: Ganesh Deshmukh as the commissioner of Panvel

टॅग्स :panvelपनवेल