शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 02:34 IST

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे.

नवी मुंबई : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, नादुरुस्त रस्त्यांचा ताप भाविकांना जाणवत आहे. गणेशोत्सवाअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक होते; परंतु महापालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने गणरायाचे स्वागत खड्ड्यांतूनच करण्याची वेळ शहरवासीयांवर ओढावली आहे.शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला; परंतु अवघ्या २४ तासांत या कामाचे पितळ उघडे पडले. महामार्गापेक्षा शहरवासीयांना अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सतावत आहे. कारण बहुतांशी रस्ते उखडले आहेत. वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाºयांनाही त्रास होत आहे. वाहनधारकांना तर कसरत करावी लागत आहे. कोपरी सिग्नलपासून ब्ल्यू डायमंड चौकाकडे जाणाºया अंतर्गत रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले मलनि:सारणाच्या चेंबरचे झाकण उखडले आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेष म्हणजे अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुसाट धावणाºया दुचाकी व रिक्षांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. कोपरखैरणेच्या काही भागात मध्यंतरी डांबराचा भराव टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले; परंतु हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. कोपरखैरणेप्रमाणेच वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, सानपाडा, नेरूळ व बेलापूर विभागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चिंता वाढली आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. त्याधर्तीवर शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे; परंतु लाडक्या बाप्पाच्या स्वागतात खड्ड्यांचे विघ्न घोंगावू लागल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.>सार्वजनिक गणेश मंडळांना चिंताशहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा वेगळाच थाट असतो. मागील काही वर्षांत आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तींवर मंडळांनी भर दिला आहे.काही गणेशोत्सवाला ३० ते ४० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीअगोदर थाटामाटात श्रींची मूर्ती आणली जाते.यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आणताना मंडळांची तारांबळ उडाली. काही मंडळांच्या गणेशमूर्ती आदल्या दिवशी आणल्या जातात.खडतर रस्त्यातून मंगलमूर्ती आणण्याचे चिंताजनक आव्हान गणेशमंडळांसमोर उभे ठाकले आहे.>लोकप्रतिनिधींची चुप्पीस्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात देशात अव्वल ठरलेल्या नवी मुंबईत रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचा फटका शहराच्या लौकिकाला बसलाच आहे. यात आता अंतर्गत रस्त्यांच्या समस्येचीही भर पडू लागली आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Potholeखड्डेGanpati Festivalगणेशोत्सव