फोरजी केबलमुळे रस्त्यांची चाळण

By Admin | Updated: February 26, 2016 04:17 IST2016-02-26T04:17:59+5:302016-02-26T04:17:59+5:30

नवीन पनवेलमध्ये खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी केबल टाकण्याकरिता रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालक त्रस्त आहेत

Furry cables due to fur | फोरजी केबलमुळे रस्त्यांची चाळण

फोरजी केबलमुळे रस्त्यांची चाळण

पनवेल : नवीन पनवेलमध्ये खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोर-जी केबल टाकण्याकरिता रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालक त्रस्त आहेत. खोदकामानंतर खड्डे योग्यरीत्या बुजवले जात नसल्याने पावसाळ्यात ते जीवघेणे ठरत आहेत. याबाबत सिडकोकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
सध्या इंटरनेटचा जमाना असून ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून फोर जी सेवा पुरविण्यास सुरूवात झाली आहे. सिडको वसाहतीत अनेक ठिकाणी फोर जीची केबल टाकण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन पनवेल, खांदा वसाहतीत केबल टाकण्यात आली. त्याकरिता कित्येक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले. मात्र ते योग्यरीत्या बुजवले जात नाहीत. अभ्युदय आणि कर्नाळा बँकेजवळ मोठमोठे खड्डे टेलिकॉम कंपन्यांकडून खोदण्यात आले आहेत.
केबल टाकण्यासाठी ड्रील करून लांबच लांब खोदाई करण्यात येत आहे. वळणावर खोदकाम केल्याने दुचाकीच्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त खड्ड्यांतील माती रस्त्यावर उडत असल्याने वाहने घसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवा संकुल ते तुळशी हाईट दरम्यानच्या खोदण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. तीच स्थिती बांठिया, सी.के.टी. विद्यालय परिसरात आहे. खांदा वसाहतीतील शनी मंदिर ते आसुडगाव बस डेपो या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याकरिता खड्डे खोदण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक मार्गावरही तीच गत आहे. सिडकोने या मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

वाहिन्या टाकण्याकरिता अनामत रक्कम घेतली जाते. काम झाल्यानंतर संबंधित विभागातून आम्हाला पत्र येते. त्यानंतर निविदा काढून रस्त्यांची डागडुजी केली जाते. फोरजीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच निविदा काढून डॅमेज भरून काढण्यात येईल.
- प्रणीक मूल,
कार्यकारी अभियंता, सिडको

Web Title: Furry cables due to fur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.