निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

By Admin | Updated: October 13, 2016 04:13 IST2016-10-13T04:13:00+5:302016-10-13T04:13:00+5:30

नगराध्यक्षपदाच्या महिला ओबीसी उमेदवारांच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर विविध पक्षातील विशेषत: इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचाईत

Frontline for elections | निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

उरण : नगराध्यक्षपदाच्या महिला ओबीसी उमेदवारांच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर विविध पक्षातील विशेषत: इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले असले तरी आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारांच्या चाचपणीच्या कामात सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहेत.
नगराध्यक्षपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असून येत्या डिसेंबर २०१६ रोजी होऊ घातलेल्या उरण नगरपरिषदेच्या ९ प्रभागाच्या १८ जागांचे आरक्षण याआधीच जाहीर करण्यात आले आहे. उरण नगर परिषदेच्या १८ जागांसाठी ९ महिला आणि ९ पुरुष असे वाटप याआधी जाहीर झाले आहे. त्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा होती ती नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची, यासाठी सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आदि पक्षांच्या नगराध्यपदासाठी असलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी अनेक स्वप्ने रंगविली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी किती कोटी खर्च करणार याचीही भाकिते विशेषत: इच्छुकांनी जाहीर केली होती. मात्र नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक पुरुष उमेदवारांच्या मनसुब्यांवर चांगलेच पाणी फेरले गेले आहे.
निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरी आता नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी उमेदवारांची विविध पक्षांकडून चाचपणीला सुरवात केली आहे. रायगड जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा याआधीच केली आहे. उरणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप यांची परिवर्तन महाआघाडीची घोषणा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.
आघाडीबाबत सेना-भाजपामध्येही अद्याप संभ्रम आहे. येत्या काही दिवसात पक्षांच्या राजकीय आघाडीच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांमध्येही पक्षीय आघाडीच्या विशेषत: सेना-भाजपा आघाडीच्या घोषणेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (वार्ताहर)

Web Title: Frontline for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.