घरफोडय़ांमुळे घबराट
By Admin | Updated: November 29, 2014 22:22 IST2014-11-29T22:22:25+5:302014-11-29T22:22:25+5:30
महाड शहरात घरफोडी, चो:यांचे सत्र सुरूच असून रोजच्या या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

घरफोडय़ांमुळे घबराट
महाड : महाड शहरात घरफोडी, चो:यांचे सत्र सुरूच असून रोजच्या या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शुक्रवारी रात्री प्रभात कॉलनीमधील गंगाधार अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरटय़ांनी फ्लॅटमधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. घरमालक सुनीता प्रकाश कांबळे या शुक्रवारी बाहेरगावाहून परतल्या तेव्हा त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा फोडून चोरी झाल्याचे लक्षात आले.
सुनीता कांबळे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
शहरातील या चोरीसत्रच्या त्रसामुळे हैराण झालेल्या व्यापा:यांनी नुकताच प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाडकरांना वेठीस धरणा:या नंदू पवार या सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा महाडकरांकडून करण्यात येत आहे. घरफोडीतील आरोपींना पकडण्यात शहर पोलिसांनी यश मिळते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नागोठणो - येथील रिलायन्स निवासी संकुलात मोठी सुरक्षा यंत्नणा तैनात आहे. मात्र तरीही संकुलातील बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून चोरटय़ांनी घरफोडीचा प्रय} केला आहे. या सहाही सदनिकांमध्ये राहणारे रहिवासी बाहेरगावी गेल्याने किती ऐवज चोरीला गेला, हे कळू शकलेले नाही.
गुरु वार, शुक्रवारी या घरफोडय़ा करण्यात आल्या असून त्यात निवासी संकुलातील बी टाइपमधील पाच आणि सी टाइपमधील एक अशा सहा सदनिकांचा समावेश आहे. याबाबत रिलायन्सचे मिलिंद गुंडोपंत कुलकर्णी यांनी नागोठणो पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
रिलायन्स निवासी संकुलातील सुरक्षा यंत्रणा एवढी मजबूत असतानाही चोरटय़ांनी घरफोडय़ा केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.