स्लेंडर लॉरीस माकडाची मुक्तता
By Admin | Updated: December 9, 2014 03:06 IST2014-12-09T03:06:09+5:302014-12-09T03:06:09+5:30
जगात दुर्मीळ असलेल्या ‘स्लेंडर लॉरीस’ या चार माकडांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर ठाणो पोलिसांनी त्यांना आता वन्यजीव विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आहे.

स्लेंडर लॉरीस माकडाची मुक्तता
जितेंद्र कालेकर ल्ल ठाणो
जगात दुर्मीळ असलेल्या ‘स्लेंडर लॉरीस’ या चार माकडांची तस्करांच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर ठाणो पोलिसांनी त्यांना आता वन्यजीव विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच तर भारतात दुस:यांदा अशा प्रकारची तस्करी पोलिसांनी उघड केली आहे.
चार ‘स्लेंडर लॉरीस’ची तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकातील हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. घोडबंदर भागातील मानपाडा पेट्रोलपंपाजवळ 7क् लाखांमध्ये त्यांचा सौदा होणार होता. त्याच वेळी 4 डिसेंबर रोजी चौघा तस्कारांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यात आली. विजू वर्गीस, नागराज गुज्जा, राजेंद्र विधाते आणि विनोद सुतार या चौघांना ठाणो न्यायालयाने 1क् डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नेटच्या आधारे पोलीस स्लेंडर लॉरीसच्या फिडिंग तसेच वास्तव्याची माहिती घेऊन सांभाळ करीत असताना वन्य जीव किंवा प्राणिमात्रंसाठी काम करणा:या कोणत्याही संघटनांनी पोलिसांकडे संपर्क साधला नसल्याची खंत वरिष्ठ पोलीस अधिका:याने व्यक्त केली.
अधिका:याच्या केबिनला दिला जंगलाचा ‘फील’ : स्लेंडर लॉरीसला तस्करांच्या ताब्यातून घेतल्यानंतर त्यांना नेमके खाद्य काय लागते, कोणते वातावरण लागते, याचा संपूर्ण अभ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी केला. त्याच आधारे त्यांची राहण्याची सोय त्यांच्या केबिनमध्ये केली. एसीद्वारे आवश्यक तापमान ठेवून जंगलाचा फील देण्यासाठी शोभेच्या झाडांच्या कुंडय़ा आणल्या.
महिनाभरापासून पाळत : महिनाभरापासून पोलिसांच्या पथकाने या तस्करांवर पाळत ठेवली होती. पोलिसांनी त्यांच्यावर ‘ट्रॅप’ लावला आणि बनावट गि:हाईक बनून आरोपींना पकडले.