शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मुंबईच्या समुद्रात चार नव्या तेल-वायू शोध विहिरी; सीआरझेडची सशर्त परवानगी

By नारायण जाधव | Updated: April 12, 2023 06:41 IST

ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने गुजरात आणि मुंबईच्या समुद्रात १४ नव्या तेल-वायू शोध विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला

नवी मुंबई :

ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने गुजरात आणि मुंबईच्या समुद्रात १४ नव्या तेल-वायू शोध विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला  आहे. यातील १० विहिरी गुजरातच्या हद्दीत, तर ४ विहिरी मुंबईच्या समुद्रात खोदण्यात येणार आहेत. या विहिरींपासून ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील फ्लेमिंगो अभयारण्यात येणाऱ्या देशी- परदेशी पक्ष्यांना धोका नसल्याचे सांगून सीआरझेड प्राधिकरणाने त्यांना सशर्त परवानगी देऊन याबाबतचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे. 

या प्रस्तावित विहिरी मुंबईच्या पूर्व किनारपट्टीपासून ११.३ किलोमीटर आणि दक्षिणेला जुहू बीचपासून १६.६ किलोमीटर  लांब आहेत. ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित विहिरींचे क्षेत्र पश्चिमेला समुद्रात ४,६२६.१९ चौ. किमी आहे. 

ओएनजीसीच्या प्रस्तावानुसार याठिकाणी ४ विहिरी खोदण्यात येणार असून सोबत, एमबी-ओएसएचपी २०१८ आणि एमबी-ओएसएचपी २०१८- ब या प्लॅटफॉर्मचे बांधकाम, या फलांटापासून सागरी पाइपलाइन टाकणे, विहिरींना हूकअप करणे, शिवाय फलाटांपासून किनारपट्टीवरील वांद्रे येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात ४,६०२ हेक्टरपेक्षा क्षेत्राचे दोन सागरी संरक्षित क्षेत्रे आहेत. 

सीआरझेडने घातल्या कोणत्या अटी?सीआरझेडने तेल विहिरींना परवानगी देताना ज्या अटी घातल्या आहेत. त्यामध्ये खोदकाम करताना घनकचरा, कोणतेही रसायने समुद्रात जाऊन तो दूषित होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. घातक कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट शास्त्रोक्त  पद्धतीने आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या नियमांप्रमाणेच करावी, बांधकामादरम्यान पर्यावरण व्यवस्थापन प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने राबवून समुद्र पर्यावरण आणि जलचरांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प