डहाणूत चार जण बेपत्ता
By Admin | Updated: November 24, 2014 23:07 IST2014-11-24T23:07:26+5:302014-11-24T23:07:26+5:30
डहाणू, बोईसर, उपविभागीय पोलीस अधिका:यांच्या अखत्यारीत येणा:या वानगाव, डहाणू, पोलीस ठाणो अंतर्गत एकूण चारजण बेपत्ता झाले आहेत.

डहाणूत चार जण बेपत्ता
डहाणू : डहाणू, बोईसर, उपविभागीय पोलीस अधिका:यांच्या अखत्यारीत येणा:या वानगाव, डहाणू, पोलीस ठाणो अंतर्गत एकूण चारजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता तरूणांचा व महिलांचा पोलीस शोध घेत आहेत.
डहाणू पोलीस ठाणो अंतर्गत सना इलियास शेख (17) र. रामटेकरी ही मुलगी 9 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली असल्याने डहाणू पोलीस तीचा शोध घेत आहेत. शिवाय वानगाव पोलीस हद्दीतील देदाळे, कॉलनीपाडा येथील रविंद्र सुकरू म्हसे (25) हा तरूण घरात कोणास काहीही न सांगता निघून गेला त्याचा इतरत्र आजुबाजूस नातेवाईकांकडे शोध घेतला तो अद्याप सापडला नाही. त्यांनी पांढ-या रंगाचा चेक्सचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पँट घातली असल्याची फिर्याद रुपाली म्हसे यांनी दिली आहे. चिंचणी धोबीतलाव येथील रहिवासी गंगाराम काशिनाथ हेमाडा (45) हा तरूण दुपारच्या सुमारास घरात कुणास काहीही न सांगता निघून गेला आहे. त्यांनी कॉफी कलरचा फुलशर्ट तसेच खाकी हाफ पँट घातलेली आहे.
अशी माहिती कुसूम हेमाडा यांनी चिंचणी पोलीसांना दिली आहे.
दरम्यान चिंचणी नागेश्वरी पाडा येथील मयुरी विठ्ठल हाडल (65) ही आदिवासी महिला गेल्या पंधरा-वीस वर्षापासून वेडय़ासारखी वागत असून यापुर्वी पंधरा ते वीस वेळा घरातून न सांगता निघून जात असे व पुन्हा येत होती. मात्र ती गेल्या चार महिन्यापासून घरातून बाहेर पडली असून ती अजूनही परत आली नाही. त्यांनी चॉकलेटी रंगाची नऊवारी साडी परिधान केली असल्याची माहिती सुभाष हाडल यांनी चिंचणी पेालीसांना दिली आहे. डहाणूतील वरील चारजण बेपत्ता झाल्याने पेालीसांमार्फत त्यांचा शोध सुरू आहे.
(वार्ताहर)