अनधिकृत बांधकाम प्रकरणी चार गुन्हे दाखल
By Admin | Updated: April 23, 2017 03:51 IST2017-04-23T03:51:46+5:302017-04-23T03:51:46+5:30
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात पालिकेने गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये

अनधिकृत बांधकाम प्रकरणी चार गुन्हे दाखल
नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात पालिकेने गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नऊ जणांचा समावेश आहे.
गत काही वर्षात शहरात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सर्व्हेच्या माध्यमातून ३४४ अनधिकृत बांधकामांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्याआधारे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकामार्फत विभागनिहाय पाहणी करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात गत चार दिवसांत नऊ जणांविरोधात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. नंदकुमार भोईर, तुळशीराम भोईर, प्रभाकर भोईर, मुकेश पांडे, विजय नायर, नरेंद्र सिंग, विठ्ठल पाटील, राबिका शेख, राजेंद्र रायकर, सय्यद सिद्दीकी, नरेशचंद्र सील व प्रभाकर भोर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी केलेल्या बांधकामांना महापालिकेची कोणतीही परवानगी नसल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी पालिकेने त्यांना नोटीस देखील बजावली होती. विनापरवाना सुरू असलेली अनधिकृत बांधकामे संबंधितांनी थांबवावीत व स्वत: पाडावीत अशा नोटिसा बजावल्या होत्या.
यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महापालिकेच्या या धडक कारवाई मोहिमेअंतर्गत यापुढेही अनेकांवर गुन्हे दाखल केले जाणार असून मागील १५ दिवसांत दीडशेहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल असा प्रशासनाचा विश्वास आहे. (प्रतिनिधी)