अनधिकृत बांधकामांप्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: October 25, 2015 00:32 IST2015-10-25T00:32:20+5:302015-10-25T00:32:20+5:30
दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनधिकृत इमारती उभारून बनावट कागदपत्राद्वारे रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी

अनधिकृत बांधकामांप्रकरणी चौघांना अटक
नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनधिकृत इमारती उभारून बनावट कागदपत्राद्वारे रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पांडुरंग अपार्टमेंट, शिवराम अपार्टमेंट व केरू प्लाझा या अनधिकृत इमारतीमध्ये घरे विकत घेऊन फसवणूक झालेल्या रहिवाशांनी विकासकांविरोधात तक्रार केलेली. त्यानुसार एकूण १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. यादरम्यान विटावा व माजीवडा परिसरातून वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांचे विषेश पथकाने अटक केली. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये चौघांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. रमेश खारकर, किशोर भोईर, नितेश मोकाशी व मुकेश मढवी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)