माजी पालकमंत्र्यांच्या खैरणे, बोनकोडे गावातील खड्डे बुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:36 IST2017-08-02T02:36:34+5:302017-08-02T02:36:34+5:30
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या खैरणे बोनकोडे गावातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले होते. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविले असून,

माजी पालकमंत्र्यांच्या खैरणे, बोनकोडे गावातील खड्डे बुजवले
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या खैरणे बोनकोडे गावातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले होते. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविले असून, नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
पावसामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील अनेक रोडवर खड्डे पडू लागले आहेत. सर्वाधिक खड्डे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या गावामध्ये पडले होते. पूर्ण रोडची चाळण झाली होती. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होऊ लागली होती. मोटारसायकलचा अपघात होऊ लागला होता.
रिक्षा व येथून नियमितपणे जाणाºया इतर वाहनधारकांनाही तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील खड्ड्यांविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच, महापालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
सर्व खड्डे बुजविल्याने वाहतुकीला होणारा अडथळा थांबला आहे. नागरिकांचीही गैरसोय दूर झाली असल्याने सर्वांनी महापालिकेचे व ‘लोकमत’चेही आभार मानले आहेत. पुन्हा रोडवर खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.