घणसोलीचे माजी नगरसेवक संजय पाटील यांचे निधन
By Admin | Updated: November 6, 2016 04:04 IST2016-11-06T04:04:01+5:302016-11-06T04:04:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे घणसोली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय पाटील उर्फ अंकल यांचे शनिवारी पहाटे दिर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील

घणसोलीचे माजी नगरसेवक संजय पाटील यांचे निधन
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे घणसोली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय पाटील उर्फ अंकल यांचे शनिवारी पहाटे दिर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
घणसोली येथील माजी नगरसेवक संजय पाटील यांनी राजकारण विरहीत मैत्रीचे संबंध जपले होते. त्यांच्या विनोदी व मनमिळावू स्वभावामुळे बहुतांश नवी मुंबईकरांना ते परिचित होते. विभागातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात याकरिता अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. सिडको व महापालिकेच्या कागदोपत्री प्रक्रियेत अडकलेल्या घणसोली विभागाच्या हस्तांतरणासाठी देखिल त्यांनी विषेश पाठपुरावा केला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच घणसोलीकरांनी उत्स्फुर्त बंद पाळला. एकूणच घणसोली गाव व कॉलनी परिसरात शोककळा पसरली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घणसोलीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजीमंत्री गणेश नाईक, आमदार संदिप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, काँग्रस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांच्यासह इतर नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)