घोरपडीची शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:57 IST2019-11-01T23:29:03+5:302019-11-01T23:57:39+5:30

बेलापूर भागातून केली अटक

Forest department arrests poaching victim | घोरपडीची शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक

घोरपडीची शिकार करणाऱ्यास वनविभागाने केली अटक

ठाणे : घोरपडीची शिकार करून कत्तल करणाºया सुभाष देवजी राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ठाणे वनविभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.

बेलापूर येथील सेक्टर आठ दुर्गामातानगर येथे घोरपड या वन्य प्राण्याची चाकूने कत्तल होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल मुठे यांना मिळाली होती. तसा व्हिडिओदेखील या त्यांना मिळाला. याच माहितीच्या आधारे ३० आॅक्टोबर रोजी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक सनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेद्र मुठे, ठाणे वन्यजीव विभागाचे वनपाल मनोज परदेशी, वनरक्षक अर्जुन निचिते आणि सचिन सुर्वे आदींच्या पथकाने पुनर्वसू फाउंडेशनचे सदस्यांच्या मदतीने या मृत घोरपडीचा शोध घेतला. तेंव्हा सीबीडीतील सेक्टर आठ मधून राठोड याला या पथकाने ताब्यात घेतले. ही घोरपड घराजवळील जंगलात आढळल्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तिला दगड मारला. त्याच्याविरुद्ध वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. न्यायालयाने राठोड याला २ नोव्हेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी दिली आहे.

Web Title: Forest department arrests poaching victim