पनवेल : सिडकोच्या अतिक्र मण विभागाने जुई कामोठे सेक्टर ४७ येथील पाच मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करत इमारत जमीनदोस्त केली. सिडकोने अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील कारवाईला सुरु वात केली आहे. यावेळी सिडकोचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)जुई कामोठे येथील खेळाच्या मैदानावर सचिन भोसले नामक बांधकाम व्यावसायिकाने पाच मजली अनधिकृत इमारत बांधली होती. यापूर्वीही सिडकोने काही महिन्यांपूर्वी या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकाम तोडले होते. मात्र त्याला न जुमानता व्यावसायिकाने पुन्हा बांधकाम सुरूच ठेवले. अखेर सिडकोने जेसीबीच्या सहाय्याने इमारतीवर हातोडा फिरवून जमीनदोस्त केली. दोन दिवसांपूर्वी सिडकोच्या अतिक्र मण विभागाने कळंबोली महामार्गाजवळील दोन मजली इमारतीवर हातोडा फिरवला होता.
पाच मजली इमारत जमीनदोस्त
By admin | Updated: September 3, 2015 23:37 IST