शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पाच लाखांचे मोबाइल हस्तगत, पनवेल शहर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:51 AM

शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पनवेल : शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आठवडाभरातील मोबाइलचोरांना अटक केल्याची ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी ११ लाखांचे मोबाइल चोरणाºया दोघांना अटक करण्यात आली होती. शहर पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.पनवेल शहरातील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे तळमजल्यावरील शटरचे लॉक तोडून चोरांनी ३ नोव्हेंबर रोजी दोन लाख २८ हजार ९०० रुपये व पाच लाख ४८ हजार ९७३ रुपयांच्या ३३ मोबाइलची चोरी केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार विजय आयरे, बाबाजी थोरात, रवींद्र राऊत, पोलीस नाईक राजेश मोरे, अमरदीप वाघमारे, पोलीस शिपाई यादवराव घुले, सुनील गर्दनमारे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना अटक केली. भीम कमान बिस्टा (२५, रा. कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (३२, रा. नवीन पनवेल), चकरा उर्फ चरण बहादूर रतन शाही (२५, रा. पुणे), रमेश भवन रावल (३०, रा. कल्याण) यांना अटक करण्यात आली. यातील तीन आरोपी सोसायट्यांमध्ये वॉचमन म्हणून काम करत असून, चरण बहादूर हा हॉटेलमध्ये कुकचे काम करत आहे. आरोपींकडून चार लाख ८९ हजार ८३३ रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे २९ मोबाइल व १७ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. घरफोडी करतानाचे हत्यार (कटावणी)देखील जप्त करण्यात आली आहे.>पोलिसांचे आवाहननागरिकांनी महत्त्वाच्या वाणिज्य व इतर आस्थापना तसेच रहिवासी सोसायट्यांनी समोरील दोन्ही बाजूस रस्ता दिसेल अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.तसेच दुकानाच्या शटरसाठी सेंटर लॉकिंग सिस्टीम बसवून घ्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.