शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
4
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
5
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
6
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
7
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
8
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
9
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
10
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
11
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
12
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
13
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
14
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
15
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
16
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
17
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
18
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
19
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
20
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरच्या दिवाळे गावातील मासळी मार्केट कात टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 01:42 IST

मंदा म्हात्रे यांचा पुढाकार : १ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची तरतूद

ठळक मुद्देदिवाळी गावातील मासळी मार्केटच्या उभारणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रखडला होता. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे सलग दोन वर्षे पाठपुरावा करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  दिवाळे गावातील जुन्या मासळी मार्केटच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्केटच्या उभारणीसाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये कोटींची तरतूद केली आहे, तर महापालिकेने ४० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे.  १ कोटी ६५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा मासळी मार्केटच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. फगवाले मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक अनंता बोस यांच्या हस्ते रविवारी मार्केटचे भूमिपूजन झाले.

दिवाळी गावातील मासळी मार्केटच्या उभारणीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रखडला होता. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे सलग दोन वर्षे पाठपुरावा करावा लागला. संबंधित विभागाच्या परवानग्या मिळविताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अखेर हे सर्व अडथळे दूर झाले असून, लवकरच दिवाळे मासळी मार्केटची सुसज्ज अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी वास्तू तयार होईल, असा विश्वास आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्षे मासळी विक्री करताना समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आम्ही आमदार  मंदा म्हात्रे यांना साकडे घालत सर्व सुविधांयुक्त मार्केट उभारण्याची मागणी  केली होती, परंतु सदर मार्केटच्या जागेचा प्रश्न कायद्याच्या कचाटीत अडकल्यामुळे थोडी दिरंगाई झाली, परंतु आता सर्व काही सुरळीत झाल्याने मासळी विक्रेत्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे एकवीरा मच्छी विक्रेता संघाच्या अध्यक्षा सुरेखा कोळी यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक नगरसेविका भारती कोळी यांचेही भाषण झाले.

यावेळी माजी सभापती संपत शेवाळे, डॉ.जयाजी नाथ, स्थानिक नगरसेविका भारती कोळी, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, विकास सोरटे, बाळकृष्ण बंदरे, दर्शन भारद्वाज, दीप्ती कोळी, प्रियांका म्हात्रे, सुभाष गायकवाड, तसेच असंख्य मासळी विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.

खरेदीसाठी नागरिकांची होतेय गर्दीnदिवाळे मासळी मार्केट हे शहरातील प्रसिद्ध मार्केट आहे. या मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी शहराच्या कानाकोपऱ्यांतून लोक येतात; परंतु मागील काही वर्षांत या मार्केटची दुरावस्था झाली आहे. वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. nया पार्श्वभूमीवर मार्केटची पुनर्बांधणी करण्याची मागणी गावातील पारंपरिक मासळी विक्रेत्यांकडून केली जात होती. त्यानुसार आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.  nसर्व सुविधांनीयुक्त नवीन मार्केट होणार असल्याने मासळी विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbelapur-acबेलापूर