१०८ क्र मांकाकडून प्रथमोपचाराचे धडे

By Admin | Updated: February 15, 2016 03:05 IST2016-02-15T03:05:40+5:302016-02-15T03:05:40+5:30

दोन वर्षे यशस्वी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने (१०८ सेवा) खेडोपाडी, शहरात भरीव कामगिरी केला आहे

First aid lessons from the 108th grade | १०८ क्र मांकाकडून प्रथमोपचाराचे धडे

१०८ क्र मांकाकडून प्रथमोपचाराचे धडे

पनवेल : दोन वर्षे यशस्वी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेने (१०८ सेवा) खेडोपाडी, शहरात भरीव कामगिरी केला आहे. ही सेवा पुढील काळात माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांसह सरपंच, पोलीस पाटील आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक व वाहकांना योग्य प्रथमोपचार प्रशिक्षणाचे धडे देणार आहे. याचा फायदा एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. तिच्या जनजागृतीला पनवेलसह रायगड जिल्ह्यात सुरु वात झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत १०८ ही टोल फ्री रुग्णसेवा राज्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. या
रुग्णवाहिकेमध्ये आठ अ‍ॅडव्हॉन्स्ड बाईक सपोर्ट व २८ मूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवा आहेत. अ‍ॅडव्हान्स्ड बाईक सपोर्ट या सेवेमध्ये कार्डियाक मॉनिटर, व्हेंटिलेटर, इन्फ्युजन पंप, सिरीज पंप या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणा, तर मूलभूत प्रथमोपचार रुग्णसेवेमध्ये औषधे, वेगवेगळी स्ट्रेचर व अन्य उपकरणे आहेत. एखाद्या घटनेची अचूक माहिती, घटनास्थळाचा पत्ता आदी माहिती समजावी व जखमींवर तत्काळ प्रथमोपचार करावेत यासाठी आता माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये यांच्यासह सरपंच, उपसरपंच तसेच राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात याचा निश्चितच फायदा होईल, हा या पाठीमागील उद्देश आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण २२ रुग्णवाहिका आहेत. पनवेल तालुक्यात अजिवली, पनवेल आणि द्रुतगती महामार्ग अशा १०८
क्र माकांच्या रुग्णावाहिका आहेत. या भागात मुंबई-पुणे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा, पनवेल-सायन महामार्ग जात असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दुर्गम भागही मोठ्या प्रमाणात असल्याने त्या ठिकाणाहून रुग्णांना तातडीने रुग्णालयात आणण्याकरिता या सेवेचा फायदा होत आहे. पनवेल परिसरात खासगी रुग्णवाहिकांना चांगला पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. हीच सेवा अधिक विस्तृत स्वरूपात करण्याकरिता आरोग्य विभागाने पाऊल उचलले आहे. मिळेल त्या वेळेत शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, चावडीवर १०८ क्रमाकांची रुग्णवाहिका जाऊ लागली आहे. त्यामध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ अपघात झाल्यानंतर प्राथमिक उपचार करायचा कसा, अपघातग्रस्तांना मदत कशी करायची, याबाबत माहिती देत आहेत. आगामी काळात समाजातील घटकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती या सेवेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: First aid lessons from the 108th grade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.