दोन दरोडेखोरांचा तरुणावर गोळीबार

By Admin | Updated: February 20, 2016 02:04 IST2016-02-20T02:04:21+5:302016-02-20T02:04:21+5:30

कर्जत तालुक्यात मागील काही दिवसात दुसऱ्यांदा गोळीबार होण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नेरळ -कळंब रस्त्यावरील कोदिवले गावाच्या हद्दीत असलेल्या घरी

Firing two robbers | दोन दरोडेखोरांचा तरुणावर गोळीबार

दोन दरोडेखोरांचा तरुणावर गोळीबार

नेरळ : कर्जत तालुक्यात मागील काही दिवसात दुसऱ्यांदा गोळीबार होण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नेरळ -कळंब रस्त्यावरील कोदिवले गावाच्या हद्दीत असलेल्या घरी दरोडा घालण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखोर तरु णांनी गोळीबार केला. या गोळीबारात व्यावसायिक असलेला तरु ण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
नेरळजवळील कोदिवले येथे आकाश धुळे पत्नी आणि आईसह राहतात. त्यांची भाताची गिरणी आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी ७ वाजता गिरणी बंद करून आपल्या आईसह आकाश नेरळ येथे कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी स्वाती धुळे या एकट्याच घरी होत्या. सव्वा आठच्या सुमारास कोदिवले येथील घराचा दरवाजा कोणी तरी ठोकला. त्यावेळी स्वाती धुळे यांनी दरवाजा उघडताच तोंडाला पांढरा कपडा बांधलेले दोन तरुण घरात घुसले. माझ्या भावाचे आॅपरेशन आहे त्यासाठी पाच लाख दे असे मराठी भाषेत एक दरोडेखोर सांगत होता. तर दुसरा दरोडेखोर हा हिंदी भाषेत बोलत होता .
स्वाती धुळे यांच्या गळ्यातील गंठन हिसकावून घेत पाच लाखांची मागणी ते करत होते. त्यांच्या हातात गावठी पिस्तूल, सुरा होता. घाबरलेल्या स्वाती धुळे यांनी हुशारी दाखवत हातातील मोबाइलवरून पती आकाश धुळे यांना फोन लावला. तेव्हा त्यांनी पत्नीच्या मोबइलवरून चर्चा ऐकली. क्षणभर न थांबता आकाश धुळे यांनी घर गाठले, त्यावेळी अचानक कार आलेली पाहून त्या दरोडेखोरांनी कारवर गोळीबार करण्यास सुरु वात केली. पत्नी संकटात असल्याचे बघून आकाश धुळे हे कारमधून उतरले, तेव्हा आपला बचाव करण्यासाठी त्या दरोडेखोरांनी आकाशवर गोळीबार केला, त्यातील गोळी आकाशच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर लागली त्या दोन्ही दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेतील आकाश धुळे (२९) यांनी कारमधून पत्नी स्वाती यांना बरोबर घेवून नेरळ सरकारी दवाखाना गाठला. तेथे नेरळ मालेगाव येथील एका जीपमध्ये जखमी आकाश धुळे यांनी नेरळमधील डॉ. हेमंत शेवाळे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल केले. डॉ. शेवाळे यांनी प्राथमिक उपचार करून आकाश धुळे यांना नेरळ येथून बदलापूर येथील भगवती रु ग्णालय येथे पुढील उपचार करण्यासाठी पाठविले. (वार्ताहर)

Web Title: Firing two robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.