नवी मुंबईतील शोरुमला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

By Admin | Updated: April 23, 2017 08:48 IST2017-04-23T07:04:58+5:302017-04-23T08:48:37+5:30

नवी मुंबईतील खारघर येथे मारुती सुझुकीच्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Fire at Shorum in Navi Mumbai, both died due to fire | नवी मुंबईतील शोरुमला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबईतील शोरुमला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 23 - नवी मुंबईतील खारघर येथे मारुती सुझुकीच्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ ते दहा मारुती कार जळून खाक झाल्या आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमिक वृत्त आहे. खारघर येथे असलेल्या आदित्य प्लॅनेट बिल्डिंगला पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या बिल्डिंमध्ये मारुती सुझुकीचे शोरुम आहे. पहाटेच्या वेळी शोरुममधून धूर बाहेर आल्यानंतर नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिस आणि अग्निशामक लदाला पाचारण केले. सध्या आग विजवण्यासाठी अग्नीशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर बिल्डिंगमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या आगीमध्ये शोरूममधील मारुती सुझूकीच्या नव्या कोऱ्या 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्यात. तर शोरुमच्या दोन्हीही वॉचमनचा होरपळून मृत्यू झाला आहे. कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी मृतांची नावं आहेत. 

Web Title: Fire at Shorum in Navi Mumbai, both died due to fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.