खारघर हिलवर आगीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 19:37 IST2018-12-27T19:37:17+5:302018-12-27T19:37:23+5:30
खारघर शहरातील डोंगर रांगांवर आगीचे सत्र सुरूच आहे.

खारघर हिलवर आगीचे सत्र सुरूच
पनवेल: खारघर शहरातील डोंगर रांगांवर आगीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा एकदा ही घटना घडली सायंकाळी ४ च्या सुमारास सेक्टर ६ मधील डोंगरावर मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. या घटनेने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला होता. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील दहा ते पंधरा वेळा ही घटना घडली होती. आगीच्या घटनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आग लागते की ? की लावली जाते ? यासंदर्भात साशंकता निर्माण झाली आहे.