नवी मुंबईत 11 ठिकाणी आगीच्या घटना
By Admin | Updated: October 26, 2014 00:56 IST2014-10-26T00:56:22+5:302014-10-26T00:56:22+5:30
दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

नवी मुंबईत 11 ठिकाणी आगीच्या घटना
नवी मुंबई : दिवाळीमुळे तिन दिवसात शहरात तब्बल 11 ठिकाणी आग लागली आहे. तुर्भे जनता मार्केटमध्ये पाच दुकाने जळून गेली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीचे फटाके व पणत्यांमुळे सर्व घटना घडल्या.
तुर्भेमधील जनता मार्केटमधील एक दुकानास गुरुवारी रात्री आग लागली. मार्केटमधील सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्यामुळे व दुकानांच्या बाहेर बांबू, प्लाटिक व इतर साहित्य असल्यामुळे येथील फरसाण, हार्डवेअर व इतर पाच दुकानांर्पयत आग पसरली. नागरिकांनी अग्निशमन विभागास कळविताच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणो यांनी तात्काळ वाशी, नेरूळ, ऐरोली. सिबीडी अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळावर बोलावल्या. एक तासात सर्व आग नियंत्रणात आणली गेली.
अगिAशमन दलाने आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जादा फायर इंजीन बोलावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा पुर्ण जनता मार्केट आगीच्या भक्षस्थानी पडले असते. मार्केटमध्ये मोठय़ाप्रमाणात अतिक्रमण झाले असल्यामुळे अग्निमशमन अधिका:यांना आग विझविण्यातही तारेवरची कसरत करावी लागत होते. दुकानांबाहेर लावण्यात आलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याचे बोलले जात असून काही जण फटाक्यामुळे ही घटना घडल्याचे सांगत आहेत. आगिचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)