एचपी गॅसच्या कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:20 IST2017-08-15T02:20:25+5:302017-08-15T02:20:30+5:30

नवीन पनवेल सेक्टर १ येथील एचपी गॅसच्या कार्यालयाला सोमवारी अचानकपणे आग लागली.

Fire at HP gas office | एचपी गॅसच्या कार्यालयाला आग

एचपी गॅसच्या कार्यालयाला आग

पनवेल : नवीन पनवेल सेक्टर १ येथील एचपी गॅसच्या कार्यालयाला सोमवारी अचानकपणे आग लागली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
नवीन पनवेल सेक्टर १ मध्ये एचपी गॅस कार्यालयाची इमारत नव्याने उभी राहिली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथे शॉर्टसर्किट झाल्याने कार्यालयाबाहेर असलेल्या विजेच्या डीपीने पेट घेतला. या ठिकाणी काम करणाºया एका कर्मचाºयाला ही आग दिसली. त्याने ताबडतोब या आगीची माहिती कार्यालयात दिली. दरम्यान, जवळच असणाºया अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. सिडको व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र ही आग कशामुळे लागली याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Fire at HP gas office