नवी मुंबई - नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नाॅलेज सिटीमधील रुग्लालयाच्या इमारतीमध्ये काम सुरू असताना आग लागली लागली आहे. ही आग विझवण्याचे काम सुरू आहे. ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन समोर डीएकेसी चे मुख्य कार्यालय आहे. रोडला लागून सुपरस्पेशालीटी हाॅस्पीटलचे काम सुरू आहे. इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून आतमध्ये कलर, फर्निचर व पियूपी चे काम सुरू आहे. अडीच ते पावणेतिन दरम्यान आचानक आग लागली. कंपनीची व महापालिकेच्या यंत्रणेकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
धीरूभाई अंबानी नाॅलेज सिटीमधील रुग्लालयाच्या इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:41 IST