पनवेलमध्ये हॉटेलसह बंद गाळ्याला आग
By Admin | Updated: April 9, 2017 02:52 IST2017-04-09T02:52:54+5:302017-04-09T02:52:54+5:30
शहरात एका हॉटेल व बंद दुकान अशा दोन ठिकाणी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पनवेल अग्निशमन दल

पनवेलमध्ये हॉटेलसह बंद गाळ्याला आग
पनवेल : शहरात एका हॉटेल व बंद दुकान अशा दोन ठिकाणी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पनवेल अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने आग त्वरित आटोक्यात आणण्यात यश आले.
पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी जवळ असलेल्या एका हॉटेलला शुक्रवारी अचानकपणे आग लागली. आगीत हॉटेलमधील फ्रीज, कोल्ड्रिंकच्या बाटल्या व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे विश्राळी नाका येथील जसदनवाला कॉम्प्लेक्समधील एका बंद गाळ्याला आग लागली. या गाळ्यात वापरात नसलेले साहित्य ठेवण्यात आले होते. गाळा बंद असल्याने शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरीदेखील मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे अधिकारी अनिल जाधव यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेतली.