शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गोदामांमुळेच आगीच्या दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 23:50 IST

पनवेल, तळोजा परिसरात अनधिकृत गोदामांचे पेव फुटले आहे. भंगार सामानामुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल, तळोजा परिसरात अनधिकृत गोदामांचे पेव फुटले आहे. भंगार सामानामुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे रहिवाशांमधून असुरक्षिततेची भावना व्यक्त होऊ लागली आहे. बेकायदा गोदामांवर संबंधित विभागाकडून कारवाई करण्यात दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारी नावडे गावातील गोदामाला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेज, गोदाम आणि दुकान थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी भंगार, नादुरुस्त गाड्या, लाकडी सामान, टायर्स, प्लॅस्टिक ड्रम आदी सामान ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी नावडे येथील टायरच्या गोदामाला आग लागली. ती विझविताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. पोलिसांनी मात्र अकस्मित असल्याची नोंद करून आपले कर्तव्य बजावले; परंतु सिडको, रस्ते विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका प्रशासनाकडून या बाबत कारवाईसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.कळंबोलीपासून कल्याण फाट्यापर्यंत महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार गोदामे, गॅरेज सुरू आहेत. उरण आणि गोवा महामार्गालगतच्या रस्त्यावरही अशीच स्थिती आहे. याशिवाय खासगी जागा भाड्याने घेऊन बेकायदा टायर्स, भंगार गोदाम त्याचबरोबर गॅरेज सुरू करण्यात आले आहेत, याकरिता संबंधित यंत्रणांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही.जमीनमालकाला भाडे मिळते आणि दुकानदार कमाई करीत असल्याने सुरक्षेचा विचार केला जात नाही, त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत आहेत.डिसेंबरमध्ये भंगार पाडा येथे टायर कटिंग करणाºया गोदामाला आग लागली होती. नावडे येथेही याअगोदर अशाच प्रकारच्या टायर्सच्या गोदामाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी कळंबोली गावालगत असलेल्या गॅरेजला आग लागली. त्यामध्ये जवळपास पाच ते सहा गॅरेज जळून खाक झाले. येथे टायर साठवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या जुन्या टायरच्या गोदामाला आग लागली होती, त्याची झळ आजूबाजूच्या इमारतींना बसली होती.गोदामात विशेष करून भंगाराचा व्यवसाय केला जातो. ज्वलनशील वस्तूंची येथे साठवणूक केली जात असल्याने रोहिंजन गावच्या हद्दीत भंगाराच्या गोदामाला अनेकदा आगी लागल्या आहेत. त्याचबरोबर पळस्पे येथेही टायरचे गोदाम जळून खाक झाले होते. अशा बेकायदेशीर व्यवसायामुळे आजूबाजूच्या गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गोदाम मालक आणि चालक दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.।आगीच्या घटना२ डिसेंबर १८ भंगारपाडा५ मार्च १८ कळंबोली५ मार्च १८ धरणा कॅम्प२९ मार्च १८ रोडपाली१८ एप्रिल १८ स्टील मार्केट,कळंबोली८ जानेवारी १८ धरणा कॅम्प१४ जानेवारी १८ रोहिंजन२६ नोव्हेंबर १७ धानसर१५ एप्रिल १६ कळंबोली१६ जून १६ शिरढोण१४ एप्रिल १५ रोडपाली।पनवेल पालिका क्षेत्रात अनिधकृत गोदामांवर कारवाई सुरूच आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. त्याचबरोबर आग प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महापालिका