मास्क न वापरणाऱ्यांकडून दोन दिवसांत १ लाख ५४ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:31 IST2021-02-20T23:31:57+5:302021-02-20T23:31:57+5:30
पनवेल : राज्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसू लागल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मास्क न ...

मास्क न वापरणाऱ्यांकडून दोन दिवसांत १ लाख ५४ हजारांचा दंड
पनवेल : राज्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसू लागल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश प्रभाग समिती अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेने मोहीम हातात घेतली आहे. १९ व २० फेब्रुवारी या दोन दिवसात मनपा क्षेत्रातील खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे भागातून एकूण १ लाख ५४ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणा-याया तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क फिरणा-यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चारही प्रभागात सध्या होत असलेली कारवाई वाढविण्यात आली आहे. या कारवाईत ‘अ’ - १०,५०० रुपये, प्रभाग समिती ‘ब’ - ३०,००० रुपये, प्रभाग समिती ‘क’ - ३२,००० रुपये, प्रभाग समिती ‘ड’ - १५,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रभाग अ-खारघर - २१,५००, प्रभाग ब- कळंबोली - १५,०००, प्रभाग क-कामोठे- २०,०००, प्रभाग ड-पनवेल- १०,५०० असा एकूण ६७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालिका क्षेत्रात कोविडचे रुग्ण वाढत चालले असताना बेजबाबदार नागरिक कोरोनाबाबतचे नियम पळत नसल्याने अशा नागरिकांविरोधात पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ही मोहीम सुरूच राहाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
- हरिश्चंद्र कडू,
अधिकारी, प्रभाग ड,