कोपरखैरणेत माथाडी रुग्णालय परिसराला समस्यांचा विळखा

By Admin | Updated: May 30, 2017 06:31 IST2017-05-30T06:31:04+5:302017-05-30T06:31:04+5:30

कोपरखैरणेतील माथाडी रुग्णालयाच्या नव्या इमारत परिसराला समस्यांनी विळखा घातला आहे. वसाहतीअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्सला

Find out problems in Mathadi Hospital area in Koparkhakharan | कोपरखैरणेत माथाडी रुग्णालय परिसराला समस्यांचा विळखा

कोपरखैरणेत माथाडी रुग्णालय परिसराला समस्यांचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणेतील माथाडी रुग्णालयाच्या नव्या इमारत परिसराला समस्यांनी विळखा घातला आहे. वसाहतीअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्सला परवानगी नसतानाही त्याठिकाणी अवैध बसथांबा तयार झालेला आहे. त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रवासी जमत असल्यामुळे फेरीवाल्यांनीही पदपथावर अतिक्रमण केले आहे.
कोपरखैरणेत सर्वात मोठी माथाडी कामगारांची वसाहत आहे. त्यांच्या सोयीसाठी जुन्या माथाडी कामगार रुग्णालयापासून काही अंतरावरच तीन टाकी चौकालगत नवे रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय सुरू होण्याच्या स्थितीत आहे. परंतु रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच त्याभोवतीचा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. वाशी हायवे, सानपाडा हायवे पाठोपाठ कोपरखैरणे तीन टाकी चौकात खासगी ट्रॅव्हल्सचा अवैध बसथांबा तयार झाला आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी ट्रॅव्हल्सच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे इतर वाहनांना रहदारीला अडथळा होत आहे. तर ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याच्या निमित्ताने त्याठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी जमा होत आहेत. याची संधी साधूनच रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्याठिकाणी भुर्जी पाव तसेच इतर खाद्यपदार्थ उघड्यावर बनवून विकले जात आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते पहाटेपर्यंत चालणाऱ्या या फेरीवाल्यांची नागरिकांनी अनेकदा पालिकेसह पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्याशिवाय सेक्टर १५ येथील नाक्यावर देखील रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. परंतु त्यावर कारवाईऐवजी संबंधित तक्रारदारालाच दमदाटी झाल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. यामुळे त्याठिकाणचा अवैध बसथांबा व अनधिकृत फेरीवाले यांना प्रशासनच पाठीशी घालत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Find out problems in Mathadi Hospital area in Koparkhakharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.