अखेर कोल्हारे ग्रामपंचायतीचे विभाजन

By Admin | Updated: December 10, 2014 22:26 IST2014-12-10T22:26:30+5:302014-12-10T22:26:30+5:30

कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायतीचे अखेर विभाजन झाले आहे. लोकसंख्येनुसार कोल्हारे आणि जिते या दोन ग्रामपंचायती निर्माण झाल्या आहेत.

Finally, the division of the Kolhare Gram Panchayat | अखेर कोल्हारे ग्रामपंचायतीचे विभाजन

अखेर कोल्हारे ग्रामपंचायतीचे विभाजन

कर्जत  : कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायतीचे अखेर विभाजन झाले आहे. लोकसंख्येनुसार कोल्हारे आणि जिते या दोन ग्रामपंचायती निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या राजपत्नकामध्ये ऑगस्ट महिन्यात कोल्हारे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते, मात्न तब्बल तीन महिने कर्जत पंचायत समितीला कोल्हारे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमायला वेळ नव्हता. दरम्यान, जिते ही नव्याने अस्तित्वात असलेली कर्जत तालुक्यातील 51 वी ग्रामपंचायत आहे.
कर्जत तालुक्यात 5क् ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामे सुरु  आहे. तालुक्यातील पोशीर, कळंब, ओलमण, शेलू, कडाव, बीड, उमरोली, कोल्हारे, दहिवली, मानिवली, पिंपळोली, वाकस, मोग्रज, खांडस अशा काही मोठय़ा ग्रामपंचायती आहेत. तेथे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायती निर्माण होऊ शकतात. कोल्हारे या अशाच मोठय़ा असलेल्या ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा ठराव मासिक सभेने घेतल्यानंतर पुढे ग्रामसभेने विभाजन करण्याचा ठराव घेवून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविला.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य राजेश जाधव यांनी विभाजनचा ठराव मांडला. कोल्हारे या नवीन ग्रामपंचायतमध्ये कोल्हारे ,धामोते ही महसुली गावे आणि बोपेले यांचा समावेश करण्यात आला आहे. तर जिते या नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये जिते, कुंभे आणि बोर्ले या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा आदेश शासनाने पारित केल्यापासून कोल्हारे ग्रामपंचायत विसर्जित केली. (वार्ताहर)
 
4कोल्हारे ग्रामपंचायतीच्या खजिन्याचे वाटप  करण्यात आले, त्यात विभाजन झालेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीला सव्वा लाखाचा तर जितेला एक लाखाचा निधी देण्यात आला. सध्या कोल्हारे आणि जिते ग्रामपंचायतीची तिजोरी प्रशासक अहिरे यांच्याकडे आहे.  दोन्ही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होतील.  

 

Web Title: Finally, the division of the Kolhare Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.