अर्बन हाटमध्ये चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

By Admin | Updated: June 2, 2017 05:55 IST2017-06-02T05:55:46+5:302017-06-02T05:55:46+5:30

सिडको अर्बन हाटमध्ये समर फेस्टिव्हल सुरू असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता विशेष उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले

Film and Cultural Festival organized in Urban Haat | अर्बन हाटमध्ये चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

अर्बन हाटमध्ये चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

नवी मुंबई : सिडको अर्बन हाटमध्ये समर फेस्टिव्हल सुरू असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता विशेष उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून येत्या शनिवारी ३ जूनपासून चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १५ विविध राज्यांमधील उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे.
या महोत्सवांतर्गत शनिवारी ट्रू लव्ह स्टोरी आणि गुड मॉर्निंग मुंबई हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. रविवारी ४ जून रोजी ज्येष्ठ नागरिकांकरिता दादा-दादी दिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्य, संतुलित आहार आणि आनंदी आयुष्य याविषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या वेळी संध्याकाळी संगीत मैफलीचेही आयोजन केले जाणार आहे. सोमवार, ५ जून रोजी कथ्थक नृत्याविष्कार सादर केले जाणार असून त्यानंतर चित्रपट दाखविला जाणार आहे. मंगळवार, ६ जून रोजी बच्चेकंपनीकरिता खास चित्रपट दाखविले जाणार आहे. तसेच गुजराती नृत्याविष्कार पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. बुधवार, ७ जून ते शुक्रवार, ९ जूनपर्यंत विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले जाणार आहे. यामध्ये दर्जेदार चित्रपट दाखविले जाणार आहेत. शुक्रवार, ९ जून रोजी लावणी आणि लेझीम सादर केले जाणार आहे, तर शनिवार, १० जूनला रसिकांकरिता नृत्य व संगीताचे विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या महोत्सवादरम्यान खाद्यप्रेमींकरिता फूड स्टॉल्स याठिकाणी राहणार असून विविध राज्यातील पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

Web Title: Film and Cultural Festival organized in Urban Haat