शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील फणस बाजार समितीमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:40 IST

३५० टन आवक : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली

नवी मुंबई : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईसह पनवेलमध्ये कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात फणसाची आवक होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये दोन दिवसांमध्ये तब्बल ३५० टन फणस आला असून होलसेल मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे.

मुंबई बाजार समितीमध्ये एप्रिल महिन्यापासून फणसाची आवक सुरू झाली आहे. कोकणसह, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधून फणस विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला फणसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. यामुळे या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी जादा माल मागविला आहे. १३ जूनला मुंबई बाजार समितीमध्ये ८४ टन फणसाची आवक झाली होती. शुक्रवारी तब्बल २६८ टन आवक झाली असून यामध्ये दक्षिणेमधील फणसाचा वाटा ७५ टक्के आहे. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली असून किरकोळ मार्केटमध्ये याचे दर दुपटीपेक्षा जास्त आहेत. दक्षिणेकडील राज्यातील येणारा फणसाचा आकार मोठा असल्यामुळे ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जात आहे. एपीएमसीमधील व्यापारी व नगरसेवक रामदास पवळे यांनी सांगितले की, सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये फणसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.शनिवारीही आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलपासूनच फणस विक्रीसाठी येत असतो. पनवेलमध्येही कर्नाटकमधून आलेल्या फणसाला मोठी मागणी आहे. कोकणात आंब्याची बागायत ज्यापद्धतीने केली जाते, त्याचपद्धतीने दक्षिणेतील राज्यांमध्ये फणसाची बागायत शेती केली जाते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMarket Yardमार्केट यार्ड