शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एक लढा देवासाठी

By admin | Updated: October 30, 2016 02:30 IST

सिडको व महापालिकेने गावठाणामधील जुन्या मंदिरांनाही अनधिकृत बांधकामांच्या नोटीस दिल्या आहेत. मध्यरात्री मंदिर पाडण्याची मोहीम सुरू केली आहे. मंदिरही असुरक्षीत

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

सिडको व महापालिकेने गावठाणामधील जुन्या मंदिरांनाही अनधिकृत बांधकामांच्या नोटीस दिल्या आहेत. मध्यरात्री मंदिर पाडण्याची मोहीम सुरू केली आहे. मंदिरही असुरक्षीत झाल्यामुळे आगरी कोळी युथ फाऊंडेशनसह सामाजीक, धार्मीक संघटनांनी एक लढा देवासाठी मोहीम सुरू केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती सुरू करून मंदिरांचे रक्षण करण्यासाठीची चळवळ सुरू केली आहे. बोनकोडे गावामधील स्वातंत्र्यपुर्व काळातील विठ्ठल मंदिर सिडको व महापालिकेने अनधिकृत ठरविले आहे. गोठीवली, दिवा व इतर अनेक ठिकाणी मंदिरांना नोटीस पाठविली आहे. शहरात २५ हजार पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे असताना दोन्ही प्रशासनाला मंदिर पाडण्याची घाई झाली आहे. मंदिरांना नोटीस दिल्यानंतर काही दिवसांमध्ये मध्यरात्री जावून मंदिर पाडले जात आहे. कोपरखैरणेमधील हुनुमान मंदिर असेच मध्यरात्री पाडण्यात आले. यानंतर २१ आॅक्टोंबरला मध्यरात्री जुहुगावमधील हनुमान मंदिर पाडण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक येणार होते. याची माहीती मिळताच मध्यरात्री २०० ते २५० तरूणांनी मंदिरासमोर ठिय्या मारून कारवाई थांबविली. देवांनाही त्यांच्या अस्तीत्वाचे पुरावे द्यावे लागत असल्यामुळे शहरवासीयांनी तिव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. कारवाई थांबविण्यासाठी एक लढा देवासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आगरी कोळी युथ फाऊंडेशन, हिंदू महासभा, २८ गावांमधील देवस्थान समिती, मंदिरांचे विश्वस्त मंडह या सर्वांना संघटीत करून शहरातील मंदिर वाचविण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत वाशी, बोनकोडे, कोपरखैरणे व इतर ठिकाणी महाआरती व त्यानंतर जनजागृती करण्यात आली आहे. याशिवाय कोपरखैरणेमधील प्रकल्पग्रस्त संस्थेच्या सभागृहामध्ये जनजागृती सभेचे आयोजन केले होते. नवी मुंबई मंदिर समितीचीही स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गावदेवी मंदिर ही नवी मुंबईमधील प्रत्येक गावांचे वैशीष्ट्य. अनेक पुरातन मंदिरे गावांमध्ये आहेत. ब्रिटीश राजवटीमध्येही मंदिरांना कधीच धक्का लावण्यात आला नाही. पण सिडको व महापालिका प्रशासनाने सर्वच मंदिरांना अतिक्रमणाच्या नोटीस पाठविण्यास सुरवात केली आहे. मंदिरांच्या अस्तीत्वाचे पुरावे देण्यास सांगितले आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्या मंदिरावर कारवाई केली जाणार नाही. एखाद्या मंदिराचे पुरावे सापडले नाहीत पण ते सिडकोच्या अस्तीत्वापुर्वीचे असले तरी त्यावर कारवाई केली जात आहे. धार्मीक स्थळांवर कारवाई करण्यासाठी मध्यरात्री मोहीम आयोजीत केली जात आहे. कोपरखैरणेमध्ये अशाचप्रकारे कारवाई करण्यात आली. सकाळी नागरिक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असताना कारवाई झाल्याचे निदर्शनास आले. पुन्हा अशाप्रकारे कोणत्या मंदिरांवर कारवाई होवू नये यासाठी जनजागृती केली जात असून या मोहीमेमध्ये नागरिकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. मंदिरांसाठी भूखंडच नाहीतसिडकोने गावठाणांमधील मंदिरांसाठी पुरेसे भुखंड दिले नाहीत. यामुळे यात्रा व इतर धार्मीक कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा मिळत नाही. जुन्या मंदिरांसाठी वाढीव जागा देण्याऐवजी ती पाडण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. धार्मीक स्थळांवर पक्षपाती कारवाई करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणू नये. यासाठी चर्चेतून व सर्वांना विश्वासात घेवून मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे. शहरवासी होताहेत संघटितमंदिर वाचविण्यासाठी शहरवासी संघटीत होवू लागले आहेत. २८ गावांतील विश्वस्त मंडळ, भजनी मंडळी, वारकरी व इतर सर्व संघटना एकत्र येत असून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी संघटीत होत आहेत. सिडको व महापालिका प्रशासनाने गावांमधील जुन्या मंदिरांनाही नोटीस दिली आहे. मध्यरात्री मंदिरांवर कारवाई होत आहे. शहरातील मंदिरांचे रक्षण करण्यासाठी एक लढा देवासाठी ही चळवळ सुरू केली आहे. कायदेशीरमार्गाने लढा उभारण्यात येत असून त्यासाठी शहरवासीयांना संघटीत केले जात आहे. - मंगेश म्हात्रे, युवा प्रभारी, हिंदू महासभा