शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अन्नपूर्णाने गाठली महिला सक्षमीकरणाची पंचविशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:47 AM

अन्नपूर्णा परिवाराला मिळणारा नफा हा व्यवसायातून मिळतो. हाच नफा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जाच्या स्वरूपात वापरला जातो.

नवी मुंबई : अन्नपूर्णा परिवाराला मिळणारा नफा हा व्यवसायातून मिळतो. हाच नफा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जाच्या स्वरूपात वापरला जातो. महिलांना नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी चालना मिळते. अन्नपूर्णा परिवाराने महिला सक्षमीकरणाची पंचविशी गाठली असून सर्व सभासदांचे बँक खाते उघडून दिले आहे.२०१८पासून रोखरहित व्यवहार प्रणालीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव यांनी केले. महिलांना उद्योग आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या वतीने शनिवारी वाशीतीलसिडको एक्झिबिशन सेंटर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते; या वेळी त्या बोलत होत्या.महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहेत. याच योजनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा परिवाराच्या वार्षिक नफ्यात वाढ होत असल्याने हा नफा कर्जाच्या स्वरूपात महिलांना व्यवसायासाठी दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मायक्रो फायनान्स व्यवसायाला जबरदस्त फटका बसला; कारण मायक्रो फायनान्स देशातील गरीब लोकांना कर्ज पुरविते.बँकिंग व्यवसायातील अनुत्पादक मालमत्तमध्येदेखील गेल्या पाच वर्षांत वाढ झालेली दिसते; परंतु मायक्रो फायनान्स व्यवसायातील अनुत्पादक मालमत्ता जी गेली ५ वर्षे २ टक्केपेक्षा कमी होती, त्यात वाढ होऊन राष्ट्रीय स्तरावर ९ टक्के व राज्य स्तरावर २० टक्के इतकी झाली.अन्नपूर्णा केवळ गरिबांना बिनातारण कर्ज सुविधाच पुरवित नाही तर त्यांना एक सर्वंकष आर्थिक पॅकेज ज्यामध्ये कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार विमा, म्हातारपणाची सोय म्हणून पेंशन योजना तसेच विना आर्थिक सेवांमध्ये पाळणाघरे, क्लायंट शिक्षण, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण आदी सेवाही पुरवित असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव यांनी दिली.मेळाव्यांतर्गत २० आदर्श मातांना गौरविण्यात आले. तसेच ११ उत्कृष्ट उद्योजिका आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाºया ९ महिलांचा गौरव करण्यात आला. डॉ. स्मिता शहापूरकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी जागरूक करत यंदाच्या बजेटवर मात्र नाराजी व्यक्त केली.>आर्थिक वर्षात१५० कोटींचे वाटप२०१७-१८ या आर्थिक वर्षात अन्नपूर्णा परिवाराने एकूण १५० कोटींचे कर्ज सभासदांना वाटप केले आहे. परिवारातील सदस्यांना १३० लाख एवढी रक्कम आजारपणाच्या दाव्यांपोटी दिली.गेल्या आर्थिक वर्षात अन्नपूर्णाने ३८ लाख एवढी रक्कम मृत्यूच्या दाव्यांपोटी दिली. कमी व्याज दरात जास्त कर्ज, कर्जाची सीमा ही तीस हजार ते वीस लाख विना तारण देणे, आरोग्य विमा हा मागील वर्षीपेक्षा यंदा २० ते ३५ हजार प्रति व्यक्ती असणार आहे.>नोटाबंदीवर आधारित पथनाट्य सादर करत त्याच्या झालेल्या परिणामांविषयी माहिती दिली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम, अन्नपूर्णा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.