शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पनवेलमधील फार्महाऊसजवळ सलमान खानची हत्या करण्याचा कट; आणखी एका आरोपीला राजस्थानातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 19:40 IST

सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणात आणखी एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

Salman Khan  : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  सलमान खानवर त्याच्या पनवेल फार्महाऊजवळ संपवण्याच्या कटात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल येथील फार्महाऊसजवळ सलमानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दीपक गोगलिया उर्फ ​​जॉनी वाल्मिकी याला राजस्थानमधून अटक केली. राजस्थानच्या भिवानी जिल्ह्यातून दीपक गोगलिया याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या प्रकरणात आता या आरोपींना तिथल्या कुठल्या स्थानिक व्यक्तीने मदत केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने रचला होता. सलमान खानच्या फार्महाऊसजवळ  त्याची कार थांबवून त्याच्यावर एके-४७ रायफलने गोळ्या झाडण्याचा कट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने आखला होता. मात्र याची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. धनंजय उर्फ ​​अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ ​​न्हवी, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ ​​जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आता या प्रकरणात पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, १४ एप्रिल रोजी लॉरेन्स गँगशी संबंधित दोन शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे दोन वाजता आरोपींनी हवेत तीन ते चार गोळ्या झाडल्या. हवेत गोळीबार करून आरोपींनी तिथून पळ काढला होता. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेलCrime Newsगुन्हेगारी