गोमांस प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:17 IST2018-08-18T05:17:18+5:302018-08-18T05:17:30+5:30

पनवेल तालुक्यातील गावामध्ये जनावरांची हत्या करून त्यांचे मांस चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

The fifth accused in the beef case arrested | गोमांस प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

गोमांस प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

पनवेल - तालुक्यातील गावामध्ये जनावरांची हत्या करून त्यांचे मांस चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी तालुका पोलीस ठाणे व खांदेश्वर हद्दीतील गुन्हे कबूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.
तालुक्यात जनावरांची हत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी मोरबे-भल्याची वाडी येथील नामा पारधी यांचे दोन बैल चोरून त्यांचे मांस पळवून नेण्यात आले होते. अशाच प्रकारच्या घटना तालुक्यातील नेरे, वळवली, चिरवत गावांमध्ये घडल्या होत्या. जनावरांची हत्या करून त्यांची कातडी त्याच ठिकाणी टाकून मांस नेले जात असे. १४ आॅगस्ट रोजी चिरवत गावात जनावरांची हत्या करून त्यांचे मांस पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी २४ तासांत सापळा रचून चार आरोपींना अटक केली. शुक्रवारी पाचव्या आरोपीलाही अटक झाली. त्या सर्वांना १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: The fifth accused in the beef case arrested