फेरीवाल्यांना तीव्र विरोध
By Admin | Updated: October 30, 2014 01:52 IST2014-10-30T01:52:52+5:302014-10-30T01:52:52+5:30
ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.

फेरीवाल्यांना तीव्र विरोध
ठाणो : ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे. स्टेशन परिसरात ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सवार्धिक तक्रारी आल्या आहेत.
सवार्धिक तक्रारी फेरीवाल्यांविषयीच्या आहेत. त्यापाठोपाठ पोस्टर, बॅनरच्याही तक्रारी आल्या आहेत. परंतु, त्यावर केवळ तात्पुरती कारवाई होत आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात व सॅटीसवर या फेरीवाल्यांची गर्दी वाढत आहे.
ठाणो महापालिकेने फेरीवाला धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आता शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, वारंवार मुदतवाढ देऊनही फेरीवाल्यांकडून या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ खराब करणा:या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांविरोधात किंवा रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकणा:यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले होते. परंतु तरीही फेरीवाले वाढतच आहेत. तक्रारी आल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते. परंतु, फेरीवाले पुन्हा येतात. पोस्टर, बॅनर व होर्डिग्जसंदर्भातील तक्रारींवरसुद्धा कारवाई झाली की नाही, याचे उत्तर मात्र पालिकेकडे नाही. महापालिकेने वर्षभरापूर्वी अनधिकृत बांधकामांसंदर्भात टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. यावर मागील वर्षात 193 तक्रारी आल्या. यातील काही बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, यंदा आतार्पयत या क्रमांकावर 46 तक्रारी आल्या आहेत. सर्वाधिक 14 तक्रारी या मुंब्य्रातील आहेत. त्याखालोखाल वर्तकनगरमधून 1क्, वागळे इस्टेटमधून तीन, रायलादेवी परिसरातून दोन, माजिवडा- मानपाडा येथून दोन, कळव्यातून दोन आणि कोपरीतून एका तक्रार आली आहे. नौपाडा आणि उथळसर प्रभाग समित्यांमधून एकही तक्रार आलेली नाही. असे असताना एकाही बांधकामावर कारवाई झालेली नाही.
8क् टक्के कर्मचारी निवडणुकीत व्यग्र होता. त्यामुळे कारवाई करता आली नाही, अशी माहिती पालिकेने दिली. परंतु, येत्या काही दिवसांत या तक्रारींवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
एखादा फेरीवाला कचरा करून तो उचलत नसेल आणि ते एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास आले तर त्याने मनपाच्या 18क्क्2221क्8 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेने केले होते. 2 सप्टेंबर 2क्14 रोजी हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला होता.